पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व सामाजिक वनीकरण विभाग चोपडा यांचा संयुक्त विद्यमाने ​वनमहोत्सव अंतर्गत 1000 वृक्ष लागवड

 

पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व सामाजिक वनीकरण विभाग चोपडा यांचा संयुक्त विद्यमाने ​वनमहोत्सव अंतर्गत 1000 वृक्ष लागवड 

 चोपडा दि.११(प्रतिनिधी)  'वन महोत्सव मोहिमे' अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग चोपडा व पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नारोद येथील रोपवाटिकेच्या परिसरात वृक्षरोपण मोहीम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पाडली. सामाजिक वनीकरण विभाग चोपडा आणि पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 10 ऑगस्ट 2026 रोजी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ​

          सामाजिक वनीकरण विभाग चोपडा येथील वनक्षेत्रपाल मा. सविता सोनवणे मॅडम आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक  व्हि.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रा. नंदलाल वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, "पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे," असे प्रतिपादन केले. तसेच उपस्थित सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व केंद्र सरकारच्या "एक पेड माँ के नाम" या संकल्पनेला बळ देणाऱ्या या मोहिमेस शुभेच्छा दिल्या. 

          या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल आर. इ. पाटील, आरती मोरे, वैशाली अहिरे, अस्मिता पगारे तसेच वनरक्षक कविता पाटील, क्लार्क गुणवंत देसले आणि वनसेवक अंकुश भिल आणि डूपक कोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

          ​कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली पाटील मॅडम, अजय सैंदाणे, योगराज रायसिंग, दिवाकर बाविस्कर, सौरभ कुलकर्णी, संजय भादले, अशिका पाटील आणि गजानन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने