हातेडचे रहिवासी उद्योजक गणेश रणछोड सोनवणे यांना "राज्यस्तरीय उद्योजक रत्न पुरस्कार"प्रदान
चोपडा,दि.५(प्रतिनिधी) तालुक्यातील आदर्श गाव हातेड बुद्रुक गावात अजून ऐक मानाचा तुरा हातेड बु!! येथील उद्योजक गणेश रणछोड सोनवणे यांना उत्कृष्ट उद्योजकीय कार्याचे दखल घेत प्रतिष्ठित "राज्यस्तरीय उद्योजक रत्न पुरस्कार"प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन भारत सरकार यांच्या वतीने धुळे येथे 2 ऑगस्ट 2026 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती चा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होतं ..या कार्यक्रमात गणेश आर.सोनवणे हातेड तालुका चोपडा यांचे "उद्योजक रत्न" म्हणून निवड करण्यात आली होती..
मेहनत जिद्द आणि सातत्यपूर्ण कार्याच्या बळावर गणेश सोनवणे यांनी आपल्या उद्योजकता क्षेत्रात एक वेगळी व प्रभावी ओळख निर्माण केले आहे त्यांच्या या यशामुळे अनेक नवोदित उद्योजकाना नवीन प्रेरणा मिळाली असून , या सन्मानामुळे संपूर्ण तालुक्यातुन विविध स्तरावरुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खरोखरच हा पुरस्कार योग्य व्यक्तीच्या कार्याचा योग्य सन्मान आहे असे मनापासून वाटते ,असे यांचे बंधू श्री प्रवीण शंकराव सोनवणे यानी मनोगत व्यक्त केले तसेच गणेश सोनवणे यांचेवर हातेड परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
