श्री.अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघ मालेगावच्यावतीने चोपड्यात कमला नेहरू वसतीगृहात कपडे वाटप
♦️ गजवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे काळाची गरज : महामंत्री श्री.प्रदीपभाई मिलापचंद बरडिया
सध्याच्या युगात झेंड्याला सलाम करून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासोबत उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर मदतीचा थाप देणेही आवश्यक आहे.म्हणून खऱ्या गरजूंना योग्य ती मदत देऊन पुढे आणण्याचे काम करणे आज अत्यंत गरजेचे असून त्यातच खरा मानवार्थ सामावलेला आहे. "मानव सेवा हीच ईश्वर सेवा" असल्याने ज्याकडे आहे त्यानं काही तरी देण्याची भावना ठेवल्यास गरिब आपल्या पायावर उभा राहिल असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकारिणीची सदस्य डॉ.रामलालजी जैन, सदस्य श्री संजय चंपालालजी बरडिया, सदस्य शैलेश पारसमलजी जैन ,महाराष्ट्र नवयुवक शाखा कार्यकारिणीची सदस्य श्री नितीन मिलापचंदजी जैन, महाराष्ट्र शाखा नवयुवक कार्यकारणी सदस्य श्री आकाश प्रदीपजी जैन,, कमला नेहरू मुलींचे वस्तीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ,अधिक्षिका कावेरी कोळी ,कर्मचारी वर्ग व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

