पंकज विद्यालय चोपडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 पंकज विद्यालय चोपडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


चोपडा,दि.१६(प्रतिनिधी) : पंकज विद्यालय चोपडा येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विभागाचा संयुक्तिक कार्यक्रम आयोजित करण्यातआला.ध्वजारोहण समारंभ  संस्थाध्यक्ष श्री. पंकज बोरोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष श्री. अविनाश राणे, श्री. अजित पाटील (गटशिक्षणाधिकारी) संचालक श्री. गोकुळ भोळे सौ.दिपाली बोरोले शिक्षण विभाग मार्गदर्शक प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या झेंडा गीताने उपस्थितांची मने जिंकली. माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत व नृत्याने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कवायत व संचलन सादर केले. विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक संचलनाने आणि घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व नागरिकांची कर्तव्ये यावर प्रभावी भाषणे केली.

पंकज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल यशस्वी विद्यार्थी मित्र व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश अभिमानास्पद असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. वाढदिवसानिमित्त विद्यार्थी शुभेच्छा देण्यात आल्या.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या विविधांगी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राथमिक मुख्याध्यापक एम व्ही पाटील व सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कवायत संचलन योगेश चौधरी यांनी तर सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने