अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद'च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी रामदास पावरा यांची निवड ​♦️जागतिक आदिवासी दिनी नाशिक येथे हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान ​

 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद'च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी रामदास पावरा यांची निवड 

​♦️जागतिक आदिवासी दिनी नाशिक येथे  हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

चोपडा ,दि.१०( प्रतिनिधी):अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रामदास आईदास पावरा यांची अधिकृत निवड झाली आहे. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त रविवारी (९ ऑगस्ट) नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ  यांच्या हस्ते श्री. पावरा यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

​श्री. रामदास पावरा यांचे सामाजिक कार्य व समाजाबद्दलची तळमळ लक्षात घेऊन, परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष  लकी जाधव आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  इंजि. गणेश गवळी यांनी संगणमताने ही निवड केली.

​सामान्य आदिवासी जनतेच्या न्यायहक्कांसाठी ही परिषद संपूर्ण भारतभर प्रामाणिकपणे व आक्रमक लढा देते.

​"परिषदेने सोपवलेली ही जबाबदारी स्वीकारून तळागाळातील तरुण-तरुणींच्या प्रश्नांसाठी आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन," अशी प्रतिक्रिया नियुक्तीनंतर श्री. रामदास पावरा यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने