अडावद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात तक्रारींचा पाऊस : ७२३ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
चोपडा,दि.२६(प्रतिनिधी) येथे क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयात राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील अडावद मंडळातील ९ गावांसाठी एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन आमदार आण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे प्रमाणपत्रे व धनादेश प्रदान केले. यावेळी नागरिकांनी रेशन व घरकुल या बाबतीत आमदारांकडे तक्रारी मांडल्या त्या तक्रारींचे जागेवरच अधिकाऱ्याकडून सोडविल्या म्हणून आमदारांचे आभार लाभार्थी मानत होते.
२६ रोजी सकाळी दहा वाजता आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे ढोल ताशांच्या गजरात शामराव येसो महाजन शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने जोरदार स्वागत करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, अजितदादा पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. मंचकावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
नागरिक सहभाग व लाभ- शिबिरात २००० ते २३०० नागरिकांनी उपस्थिती देत लाभ घेतलात. यात विविध योजनांचा. विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.
उपस्थित मान्यवर व अधिकारी- अमळनेर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात गटविकास अधिकारी चोपडा पंचायत समिती अंजली गर्गे, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले, अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, नायब निवासी तहसीलदार योगेश पाटील, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र पाटील, दिपक साळुंखे, सरपंच बबनखा तडवी, वडगाव बु. चे माजी सरपंच नामदेव पाटील, विकासो संचालक लोकेश काबरा, संचालक प्रकाश महाजन, प्रभाकर महाजन, दुध डेअरीचे माजी चेअरमन संजय पाटील, माजी पंचायत समिती सभापती ताहेरखा मण्यार , ग्राम पंचायत सदस्य रियाजअली सैय्यद, माजी पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक संजय महाजन,दिपक चौधरी,प्रदिप बारी, मंगल इंगळे, एम.के. शेटे, रामकृष्ण महाजन, रंजनाताई भोई, नयजाताई पावरा यांचेसह सर्व तालुका स्तरीय कृषी विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, भूमिअभिलेख विभाग, वन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, सिंचन विभाग, बालविकास विभाग, घरकुल व रोजगार हमी विभाग, शिक्षण विभाग, सिंचन विभाग यांचेसह सर्व अधिकारी, कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते.वरील सर्व विभागांच्या स्टॉल लावण्यात आले होते. त्यास आमदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तसेच योग्य त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यात.
तक्रारींचा जागेवरच केला निपटारा
सर्वाधिक तक्रारी घरकुल, पुरवठा, निराधार योजना यांच्या संदर्भात करण्यात आल्यात. अन्य विभागाच्याही तक्रारी करण्यात आल्यात.
सर्व तक्रारींचा निपटारा आमदारांनी अधिकाऱ्यांना समक्ष हजर करून करण्यात आल्यात.
यावेळी बचत गट, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक लाभ, आयुष्यमान भारत कार्ड, अपंग, निराधार, वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.
आरोग्य विभागाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. एक गहू काढण्याचे मशीन , दोन ट्रॅक्टर यांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

