वेळोदे विकास सोसायटी चेअरमनपदी प्रकाश चौधरी तर व्हा चेअरमनपदी शैलेश बोरसे बिनविरोध

 वेळोदे विकास सोसायटी चेअरमनपदी प्रकाश चौधरी तर व्हा चेअरमनपदी शैलेश बोरसे बिनविरोध 

चोपडा,दि.२१(प्रतिनिधी) : वेळोदे येथे गजानन विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवड बिनविरोध करण्यात आली असून चेअरमन पदी प्रकाश चौधरी व व्हा चेअरमन शैलेश बोरसे यांची निवड प्रक्रिया सुरू असताना दोघपदांसाठी एक एक अर्ज असल्याने निवड अविरोध झाली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री बारी  व त्यांना सहकार्य म्हणून संस्थेचे सचिव कृष्णा आप्पा यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे संचालक सौ. आशाबाई सोनवणे, संध्या बोरसे ज्ञानेश्वर पाटील, सुभाष नेरपगार, हिम्मतराव नेरपगार, उत्तम चौधरी, जगदीश सोनवणे, अरविंद मोरे, दीपक निरपगारे, लालचंद सैंदाणे, विलास बोरसे, हे संचालक उपस्थित होते, निवडीबद्दल अरुण सोनवणे, सुधीर बोरसे, मांगीलाल बोरसे, रॉयल टेलर, ताराचंद सोनवणे सर, विश्वास सोनवणे सर, सुरेश मोरे, रवींद्र आप्पा मोरे ,बापू बोरसे, सुभाष सैंदाणे, अरुण बोरसे, श्रीराम चौधरी, पांडुरंग चौधरी , चेतन बोरसे,अमोल चौधरी, दादाभाऊ करणकाळे, सतीश बोरसे, भालचंद्र चौधरी, संस्थेचे कर्मचारी प्रदीप बोरसे, व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले ‌‌.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने