चि. अखिलेश जगदीश सोनार सनदी लेखापाल परीक्षेत उत्तीर्ण

 चि. अखिलेश जगदीश सोनार सनदी लेखापाल परीक्षेत उत्तीर्ण 


चोपडादि.२१(प्रतिनिधी) तालुक्यातील घोडगांव येथील सुवर्णकार समाजातील माजी सरपंच  रमाकांत जिवनलाल सोनार यांचा नातू व  उपविभागीय अधिकारी म्हणून सा. बां. विभाग ठाणे येथे कार्यरत श्री. जगदीश रमाकांत सोनार व सौ. प्रतिभा जगदीश सोनार यांचा कनिष्ठ सुपुत्र तसेच फ्लोरिडा टेक युनिव्हर्सिटी (अमेरिका ) येथे कार्यरत चि.आशुतोष जगदीश सोनार यांचे लहान बंधू आहेत 

 चि अखिलेश *CA* ची ही अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्याने पहिल्याच प्रयत्नात हे मोठे सुयश  मिळविल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. चि. अखिलेशच्या या यशाबद्दल आणि पुढील वाटचालीस सुवर्णकार समाजातर्फे  आणि समस्त घोडगांव ग्रामस्त यांच्या  अभिनंदन करून  शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने