घोडगाव केंद्रशाळेत नवागतांचे स्वागत,बैलगाडी व घोड्यावरून मिरवणूक
चोपडा,दि.18(प्रतिनिधी): घोडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत नवागतांचे स्वागत करून बैलगाडी व घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक वाटप ही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच इंदुबाई भील, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनल राजेंद्र धनगर,ज्ञानेश्वर पाटील,राजेंद्र धनगर,महेंद्र पारधी,सीमा कोळी, ग्रामपंचायत सदस्य जयवंत पाटील,चेतन पाटील, नानाभाऊ सुतार ,पंढरीनाथ पारधी, मुख्याध्यापक विलास पाटील,शिक्षक, अंगणवाडी सेविका,मदतनीस व विद्यार्थी उपस्थित होते.......
