वेळोदे येथे प्राथमिक शाळेत ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

 वेळोदे येथे प्राथमिक शाळेत ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

चोपडा दि.18(प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळोदे येथे प्रवेश उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला ‌.या कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  कमलेश  सैंदाणे,उपाध्यक्ष श्रीमती शारदा योगेश भोई ,सर्व सदस्य ,पालक वर्ग अंगणवाडी कर्मचारी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सुरुवातीला बैलगाडी सजून त्यावर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बसून ढोल ताशांच्या गजरात गावात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. शाळेमध्ये प्रवेश उत्सवाचे सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नवगतांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वाटप सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले. गणेश वाटप देखील एवढ्या दोन-तीन दिवसात करण्यात येईल असे सांगण्यात आले. या कार्यक्रमाला  सुभाष उत्तमराव नेरपगारे 2100 रुपये,  सुभाष भिला सैंदाणे 1100 रुपये ,अनिल लोटन बोरसे 1100 रुपये लोक वर्गणी स्वरूपात रोख रक्कम चार हजार तीनशे रुपये तसेच निवृत्त माध्यमिक मुख्याध्यापक  श्री संजय नारायण बोरसे यांच्याकडून इयत्ता पाचवीच्या वर्गाला 43 इंची स्मार्ट टीव्ही देण्यात आली. संजय बोरसे यांच्या मनोगतातून या शैक्षणिक वर्षी इयत्ता चौथी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी व इयत्ता पाचवी नवोदय साठी पात्र विद्यार्थी यांना विमान प्रवास घडवून आणण्यासाठी सुप्रभात फर्टिलायझर चे मालक श्री अरुण प्रल्हादराव सोनवणे यांनी आर्थिक भार उचलण्याची हमी दिली 

 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व पालक वर्ग प्रशांत वाडीले , सोनवणे मॅडम, पाटील मॅडम, भटू वाडिले,

 ग्रामस्थ यांनी अनमोल असे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी गावातील डोंगरसिंग पावरा ,सुनील पावरा , सुरपाल पावरा,संजय करंकाळे,प्रवीण करंकाळे, सुनील करंकाळे, शैलेश बोरसे, मांगीलाल बोरसे, गणेश पाटील ,अमोल चौधरी ,अनिल सोनवणे ,अशोक पवार ,सागर कोळी ,सूत्रसंचालन संजय बोरसे यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका कपिला पाटील यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने