डोंबिवली येथे नितीनकुमार युवराज मैलागीर यांचा ‘ उत्कृष्ट शिक्षक व समाजसेवक पुरस्काराने गौरव

 डोंबिवली येथे नितीनकुमार युवराज मैलागीर यांचा ‘ उत्कृष्ट शिक्षक व समाजसेवक पुरस्काराने गौरव 


चोपडा दि.१६(प्रतिनिधी) : डोंबिवली येथे ओमकार साई बाल संगोपन केंद्रातर्फे   सिद्धी विनायक  बँकेट हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात चोपडयाचे श्री नितीनकुमार युवराज मैलागीर यांना ‘ उत्कृष्ट शिक्षक आणि समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मुख्य आयोजक अनिल साळवे, अनिकेत हिंदळेकर, राकेश भोणे आणि सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत वप्रमुख पाहुणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील काझी हैदर यांचे १३ वे वंशज शिवश्री काझी सोहेल शेख व आमदार श्री. राजेश मोरे आणि नगरसेविका श्रीमती मायाताई कांबळे यांची खास उपस्थिती होती.यावेळी श्री नितीनकुमार युवराज मैलागीर यांना ‘उत्कृष्ट शिक्षक आणि समाजसेवक पुरस्कार ‘ छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील काझी हैदर यांचे १३ वे वंशज शिवश्री काझी सोहेल शेख व कलाकार हिरेन सागर यांच्या हस्ते देण्यात आला.

श्री नितीनकुमार युवराज मैलागीर ,हे कर्जाणे आश्रम शाळा व जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोरआजंटी ता. चोपडा जि जळगाव येथे संगणक निर्देशक म्हणून कार्यरत आहेत. दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी संगणक उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा आहे.

ज्ञानदानासोबतच समाजातील दुर्बल घटकांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांचे योगदान  प्रेरणादायी आहे,"शिक्षणाचे व्रत अखंड चालवत समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या एका महान मार्गदर्शकाला 'उत्कृष्ट शिक्षक व समाजसेवक' पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने