अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जळगाव जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप पाटील यांची निवड

 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जळगाव जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप पाटील यांची निवड

 गलंगी,ता.चोपडा दि.२८(प्रतिनिधी):   राजकीय, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध लेखक,कवी,  प्रदीप मनोहर पाटील यांची "अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष" पदावर"   "निवड झाली आहे.त्यांच्या साहित्य ,सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद मोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष शुुभांगी ताई यांनी नियुक्ती पत्र  देऊन ही निवड केली आहे.

   त्यांच्या कविता, लेख,कथा.नियमित  वर्तमानपत्रात छापून येतं असतात. दिवाळी अंकात त्यांच्या लिखाणाला आवर्जून  स्थान दिलेलं असतं . महाराष्ट्रात सर्वदूर ओळख निर्माण करणारं असं  साहित्य क्षेत्रात त्यांचे कार्य असल्यामुळे  कार्याची दखल घेऊन नियुक्ती देण्यात आलेली आहे.त्यांच्या निवडीबद्धल गणपूर अनेर परिसर, तालुका जिल्हा आणि उर्वरित महाराष्ट्रातील साहित्यिक मंडळी कडून आणि राजकीय सामाजिक सर्व घटका कडून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने