वादळ वाऱ्यांनी लाईट विझले अन् नगरसेवक सुनील चौधरी यांनी स्वतः प्रभागात फिरून तासाभरात केला परिसरात लख लखाट..!!
धरणगाव,दि.२८(प्रतिनिधी): येथील वार्ड क्रमांक ८ व आजुबाजुच्या परिसरात वादळ वाऱ्यांमुळे रस्त्यांवरचे लाईट उडाले. काही टिमटिम करत होते तर काही पूर्ण बंद झाले. अशा वेळी या भागातील कर्तव्यदक्ष नगरसेवक सुनील चौधरी यांनी कोणाची तक्रार येण्याच्या आत या भागात रात्रीच्या वेळी स्वतः किती पोलवरचे लाईट बंद आहेत याची पाहणी केली आणि नगरपालिकेच्या विद्युत ठेकेदाराला बोलावून एका तासात सर्व लाईट बदललेत आणि या परिसरात अंधारातून प्रकाश पसरवण्याचे महत्वाचे कार्य केले.
नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून सुनील चौधरी यांनी कामाचा धडाकाच लावला आहे. कुठे गटारी तुंबल्यात त्यांची स्वच्छता करा,कुठे ढापे तुटले त्यांची दुरुस्ती करा, कुठे कचरा साचला त्याची विल्हेवाट लावा तर कुठे पाण्याची समस्या निर्माण झाली त्यावर तातडीने कार्यवाही करा. इतकेच नव्हे तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये एक जरी तक्रार आली तरी सुनील चौधरी कुठलीही वेळ न पाहता त्याचे निरसन करण्यासाठी धावपळ करत आहेत. इतकी तत्परता दाखवत कार्य करत राहणाऱ्या नगरसेवक चौधरी यांना नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
