आनंद निरामय योगतर्फे निवासी योग शिबिर उत्साहात संपन्न
चोपडा,दि.२८(प्रतिनिधी): आनंद निरामय योग यांच्या वतीने दि. २६, २७ व २८ जून २०२६ रोजी आनंदराज पॅलेस, तिरंगा चौक ,चोपडा येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे मार्गदर्शन योग शिक्षिका सौ. सपना टाटिया यांनी केले.
तीन दिवसांच्या या निवासी शिबिरामध्ये सहभागी महिलांना योग साधना, प्राणायाम, ध्यान, निरोगी जीवनशैली तसेच निरामय, सुंदर आणि सहज जीवन जगण्याची कला याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात विविध योगप्रकारांचा सराव, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनात योगाचा उपयोग याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला चोपडा परिसरातील अनेक महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी महिलांनी शिबिरातून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त अशा अनेक गोष्टी शिकल्याचे सांगितले आणि आनंद निरामय योगच्या या उपक्रमाचे कौतुक केले.शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद निरामय योग समूहातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.
