ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदी जयदेव देशमुख तर उपाध्यक्षपदी जिजाबराव नेरपगारे यांची फेर निवड

 ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदी जयदेव देशमुख तर उपाध्यक्षपदी जिजाबराव नेरपगारे यांची  फेर निवड


चोपडा,दि.29(प्रतिनिधी): चोपडा जेष्ठ नागरिक संघाची ३४ वी वार्षिक सभा संपन्न होऊन  अध्यक्षपदी श्री जयदेव देशमुख यांची फेर निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदाची माळ श्री. जिजाबराव नेरपगारे यांच्या गळ्यात पडली आहे

ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात काल दि.रविवार  २८/६/२०२६ रोजी वार्षिक  सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती त्यात नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे कामकाज पाहून पुनश्च बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मधुकर बाविस्करआबा,  विजय करोडपती , सुभाष गुरुजी, आर. जी. पाटील, राजेंद्र देशमुख, आर. एच. बाविस्कर, अलिझाड सर, भिमराव देशमुख,भगवान देशमुख , साहेबराव गुरुजी, संजय बजाज, सौ. ताराबाई पाटील श्रीमती नलिनी  बारोट, सौ.नलिनी देशमुख,पत्रकार  यशवंत जडे ,सौ. निर्मला पाटील,  अजब राव पाटील, शामराव पाटील, प्रमोद अहिरराव, देविदास धनगर, रवि भदाणे, पत्रकार अनिल पालीवाल, गोविंदराव मराठे , गोकुळ पाटील, विलास पाटील, प्रा. एस. एम. पाटील, देवांग सर, परशुराम पेंढारकर,    कवी  रमेश जे. पाटील,  भालेराव  रामकृष्ण माळी, प्रकाश चौधरी, एकनाथ पाटील, अरुण पाटील,प्रकाश देशमुख , राजेंद्र जगताप, शिरसाठ नाना, ताराचंद पाटील,  यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने