ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नाशिक,दि.२८( प्रतिनिधी )आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरोग्य योग अँड नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट (AYNI) यांच्या वतीने ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, ओंकार नगर, नाशिक येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले.शाळेचे अध्यक्ष के एन केंद्रे, शाखा क्र. २ व ३ च्या प्राचार्या सौ. प्रतिभा शिंदे तसेच शाखा क्र. ४ च्या प्राचार्या सौ. दीपाली गायकवाड  यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

योग शिक्षिका सौ. प्रिया जोशी यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून घेतले. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास कसा होतो याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात एकूण २५० विद्यार्थी व १५ शिक्षक सहभागी झाले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगाभ्यास करत आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्यानी आरोग्य योग अँड नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूटचे संस्थापक श्री. विजय कुकरेजा सर यांचे विशेष आभार मानले.

तसेच AYNI तर्फे सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना प्रत्येकी ₹३५०० मूल्याचा मोफत व्हिडिओ योग कोर्स भेटस्वरूप देण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने