अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


चोपडा दि.२१(प्रतिनिधी): कमळगाव येथिल अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव विद्यालयात आज दिनांक 21 जून 2026 रविवार रोजी सकाळी 7 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला 

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक  व्ही सी पाचपोळ, एस एस जाधव, एन पी पाटील,  आर एम पाटील,   अर्जुन कोळी  यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक पाचपोळ सर यांनी प्रस्ताविक केले.तसेच नितीन पाटील  यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले योग करण्याने काय फायदे होतात त्याविषयी माहिती दिली. त्याला मुक्त जीवन व स्वरांजन व्यक्तिमत्व विकास याविषयी माहिती करून दिली.तसेच योगासन स्वतः करून दाखवले व विद्यार्थ्याकडून तसेच शिक्षक व शिक्षकेतर बंधू कडून करून घेतले. वज्रासन ,वृक्षासन, ताडासन ,पर्वतासन ब्राह्मरी, अनुलोम-विलोम, शवासन यासह इतरही आसने  करून दाखवले.यावेळी श्री अर्जुन कोळी सर यांनी योगाचे महत्त्व विशद करणारे फलक लेखन केले. योग दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू व विद्यार्थ्यांनचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने