शा.ये. महाजन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

 शा.ये. महाजन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा 

डावद ता. चोपडा ,दि.२१(प्रतिनिधी):येथील शामराव येसो महाजन विद्यालय व आदर्श प्राथमिक शाळा येथे बारावा 'आंतरराष्ट्रीय योग संगम' साजरा करण्यात आला

      २१ रोजी सकाळी ७ वाजता श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित आदर्श प्राथमिक शाळा व शामराव येसो महाजन विद्यालय या शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांनी निरोगी शरीर आणि निरोगी मनासाठी योग जितका महत्त्वाचा आहे, तितकेच आपल्या दैनंदिन जीवनातील पर्यावरणपूरक सवयी देखील महत्त्वाच्या आहेत. आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग म्हणून प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि शाश्वत पर्याय स्वीकारणे ही आजची गरज आहे. हे सांगत 'क्लायमेट वॉरियर शपथ'  याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व सुदृढ आरोग्याचा मंत्र दिला. योग शिक्षक एस.टी. महाजन, पि.आर. माळी यांनी मुलांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. 

     वार्मअप, सूर्यनमस्कार पासून सुरवात नंतर  आसने ताडासन, त्रिटक ताडासन, वक्रासन,  वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन , वीरभद्रासन, पादहस्तासन, वज्रासन, बालासन, पवनमुक्तासन, बद्धकोणासन, भुजंगासन, विरासन, शवासन, इत्यादी आसन घेत, प्राणायाम मध्ये भस्त्रिका प्राणायाम, कपालभाति प्राणायाम, बाह्य प्राणायाम, अनुलोम-विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम,  शेवटी शांती मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे देऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. 

       या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक  आर. के. पिंपरे, उपशिक्षक एन. ए. महाजन, एस.जी.महाजन, एम.एन. माळी, पि. आर. माळी, एस बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस. पवार, लिपिक सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन, तसेच आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक डि. बी. महाजन, आर. जे. महाजन, एस. टी. महाजन ,वाय. एल. साळुंखे, डि. आर. वाघ, कामिनी चौधरी, पुनम सुतार आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने