अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयातर्फे पल्स पोलिओ लसीकरण जागृती रॅली
चोपडा दि.२८(प्रतिनिधी) : अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय, कमळगाव येथे पल्स पोलिओ जनजागृतीसाठी रॅली काढून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे निमित्त अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय, कमळगाव येथे विद्यार्थ्यांना पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व, त्याचे फायदे व ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे किती आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यानंतर विद्यालयाच्या वतीने संपूर्ण गावात पल्स पोलिओ जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी "दोन थेंब जीवनाचे", "प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब द्या", "पोलिओमुक्त भारत घडवूया" अशा घोषणा देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.
या रॅलीमध्ये संस्थेचे अध्यक्ष नानासो मधुकर चिंधु धनगर, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ तसेच सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे गावातील पालकांमध्ये पल्स पोलिओ लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण झाली आणि प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
