दिव्यांग सेना चोपडा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, तर उपाध्यक्ष आत्माराम पाटील यांची निवड

 दिव्यांग सेना चोपडा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, तर उपाध्यक्ष आत्माराम पाटील यांची निवड

चोपडा,दि. (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्या आदेशानुसार राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये नुतन तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची नियुक्ती करण्यात आली. 

त्यानुसार चोपडा तालुकाध्यक्ष म्हणून अनिल पाटील तर उपाध्यक्ष म्हणून आत्माराम पाटील यांची निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, उपाध्यक्ष शेख शकिल, जिल्हा सल्लागार राहूल कोल्हे, गणेश पाटील, जितेंद्र पाटील, जेष्ठ कवी किशोर नेवे यांच्या हस्ते देण्यात आले. 

दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी, समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू .शिवाय चोपडा तालुक्यात गाव तेथे दिव्यांग सेना चे शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू असे नुतन तालुकाध्यक्ष अनिल पाटील व उपाध्यक्ष आत्माराम पाटील यांनी  म्हटले आहे उपरोक्त निवडीबद्दल  त्यांचे  अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने