ग.स सोसायटीमधील घोडगांवचे संजय पाटील 37 वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त

 ग.स सोसायटीमधील घोडगांवचे संजय पाटील 37 वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त


चोपडा,दि.३(प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा सरकारी नोकराची सहकारी पतपेढी जळगाव अर्थात ग.स सोसायटी जळगाव शाखा चोपडा येथील घोडगांव येथील रहिवासी माजी सरपंच तथा चोपडा सूतगिरणी चे संचालक संजय उत्तमराव पाटील हे शाखाधिकारी या पदावरून 31 मे 2026 रोजी अखंड 37 वर्षे सेवेतून सेवानिवृत्त झाले.त्याच्या सेवापुर्ती चा कार्यक्रम हा नुकताच ग स सोसायटी च्या चोपडा शाखेत करण्यात आला.कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी चोपडा माजी आमदार तथा सूतगिरणीचे चेअरमन  कैलास पाटील उपस्थित होते.

यावेळी संजय पाटील यांना शाल, श्रीफळ भेटावस्तु देत स्वपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी चोपडा सूतगिरणी चे व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील,सहकार गटाचे  श्रेष्ठी तथा माजी संचालक रमेश शिंदे,जळगाव माध्यमिक शिक्षक संघटनाचे श्रेष्ठी आर.एच बाविस्कर,ग.स सोसायटी चे माजी अध्यक्ष तथा संचालक सुनिल सूर्यवंशी,संचालक मंगेश भोईटे,योगेश सनेर,तज्ञ संचालक एकनाथ पाटील,सूतगिरणी संचालक चंद्रकांत पाटील,प्रकाश रजाळे,रमाकांत बोरसे,शेतकी संघांचे माजी चेअरमन प्रल्हाद पाटील,कृ.उ.बा चे माजी सभापती कांतीलाल पाटील,घोडगाव येथील युवराज महाराज,अनिर सर, प्रा. विजयकांत पाटील,जितेंद्र पाटील, नाना ठाकरे,विजय रजाळे,विपुल बाविस्कर,सागर पाटील,चंद्रकांत सोनवणे,आनंदराव बोरसे विभागीय अधिकारी दिलीप सपकाळे,शाखाधिकारी शितल मोरे,स्मिता मोरे,शरद पाटील,जगन्नाथ बाविस्कर,उपशाखाधिकारी मिना तडवी,किरण सोनवणे,तुषार सूर्यवंशी,जितेंद्र सूर्यवंशी,स्वप्निल सोनवणे,निलेश साळुंखे,अनिता पाटील,अनिल बाविस्कर,सुरेश पाटील यासह सोसायटी चे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मान्यवराचे स्वागत ग स सोसायटी तर्फे करण्यात आले उपस्थित मान्यवरानी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.कार्यक्रम च्या यशस्वीतेसाठी स्वप्निल पाटील,उज्वल शिंदे,योगेश बाविस्कर,ललित पाटील राहुल गोड,पियुष पाटील,यासह कर्मचारी नी मेहनत घेतली.कार्यक्रम चे सूत्रसंचालन आभार विजयानंद शिंदे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने