जागतिक सायकल दिना निमित्ताने चोपडा महाविद्यालयाची सायकल रॅली

 जागतिक सायकल दिना निमित्ताने चोपडा महाविद्यालयाची सायकल रॅली 

चोपडा,दि.३(प्रतिनिधी) : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग व पर्यावरण प्रेमी समूह यांच्या माध्यमातून 3 जून रोजी जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने सकाळी साडेआठ वाजता शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, डॉ. ए. बी.  सूर्यवंशी, समन्वयक डॉ. शैलेश वाघ, रजिस्टार डी. एम. पाटील व रॅलीत सहभागी होणारे प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

 सुरुवातीला या उपक्रमाचे संयोजक डॉ. शैलेश वाघ यांनी जागतिक सायकल दिन साजरा करण्यामागचा हेतू कथन केला. सायकल चालविण्याचे फायदे त्यांनी सर्वांना समजावून सांगितले. सायकल चालविल्यामुळे आरोग्याला फायदा होतोच शिवाय संसाधनांचा मर्यादित वापर, इंधन बचत व प्रदूषणावर उपाय म्हणून सायकल चालविण्याकडे सर्वांनी सकारात्मकतेने पहावे व नेहमी सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा असे कथन केले.

 महाविद्यालयाच्या प्रांगणातून सकाळी साडेआठ वाजता प्राचार्य संध्या सोनवणे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीचा प्रारंभ झाला. तिरंगा चौक, छ. शिवाजी महाराज चौक, ग्रामीण पोलीस स्टेशन, थाळनेर दरवाजा, महात्मा गांधी चौक, शनी मंदिर, मेन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने चोपडे शहरात भव्य दिव्य सायकल रॅली काढण्यात आली.

 रॅलीने जनजागृतीपर विविध घोषणा देऊन चोपडेकरांचे लक्ष वेधून घेतले व महाविद्यालयात रॅली परत येऊन रॅलीची सांगता झाली. प्रस्तुत सायकल रॅलीला महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.  रॅलीचे यशस्वी आयोजनासाठी प्रा. बी. एम. सपकाळ, डॉ. मुकेश पाटील, चेतन बाविस्कर, डॉ. मोतीराम पावरा, सुधाकर बाविस्कर, भैय्या पारधी, जितेंद्र वाघ यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने