जिद्द, मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर नयन देवराज भारतीय सैन्यात दाखल

 जिद्द, मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर नयन देवराज भारतीय सैन्यात दाखल

चोपडा दि.३१(प्रतिनिधी) : गलंगी गावाचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. नवलभाऊ देवराज यांचे सुपुत्र नयन नवल देवराज यांची भारतीय सैन्यात (Indian Army) निवड झाल्याने गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर नयन यांनी हे यश संपादन केले आहे. "ध्येय निश्चित असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते," हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळणार असून गावाच्या नावाला नवी उंची प्राप्त झाली आहे.

नयन यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण गलंगी गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने