राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबिरात प्रताप विद्या मंदिर कॅडेट्सची दिमाखदार कामगिरी


राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबिरात प्रताप विद्या मंदिर कॅडेट्सची दिमाखदार कामगिरी 

चोपडा दि.३१(प्रतिनिधी) : राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबिरात प्रताप विद्या मंदिर, चोपडा कॅडेट्सचा यशात सातत्य -2026-27 ची चॅम्पियन ट्रॉफी व तीन गोल्ड मेडल व व्हॉलीबॉल मध्ये सिल्वर मेडल (एकूण 6) दिमाखदार कामगिरी बजावली आहे.

49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी  अमळनेर मार्फत अमळनेर प्रताप कॉलेज येथे झालेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिर CATC 209 आयोजित करण्यात आले होते. त्यात चोपडे शिक्षण मंडळ संचलित  प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील एनसीसीच्या कॅडेट्सनी आपला यशस्वी सहभाग नोंदवला. शिबिरांतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये *तीन गोल्ड मेडल  व एक सिल्वर मेडल तसेच 2026-27 च्या चॅम्पियन ट्रॉफी चे मानकरी ठरले* . या प्रशिक्षण शिबिरात शिस्त, राष्ट्रीय एकात्मता, शस्त्र युद्ध कौशल्य(फायरिंग) सायबर सुरक्षा, नकाशा वाचन, आपत्ती व्यवस्थापन, रस्ता वाहतूक सुरक्षा, मौखिक व दंत आरोग्य तसेच विविध खेळ विषयांचे मार्गदर्शन देण्यात आले.

सदर प्रशिक्षण बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे, ए ओ लेफ्टनंट कर्नल  पिनाकी बनिक, सुभेदार मेजर गजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

 सदर शिबिरात विविध स्पर्धांमध्ये प्रताप विद्या मंदिर, चोपडा एनसीसी कॅडेट्सना तीन गोल्ड मेडल व एक सिल्वर मेडल प्राप्त झाले तसेच 2026-27 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी चा बहुमान मिळविला.

 या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन  राजाभाई मयूर,सचिव आदरणीय माधुरी मयूर संचालक  श्रीमती उर्मिलाबेन गुजराथी, श्री.चंद्रहास गुजराथी,  श्री.भूपेंद्र गुजराथी, श्री .रमेश काकाजी जैन, मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी पाटील मॅडम उपमुख्याध्यापक श्री ए एन भट सर, पर्यवेक्षक श्री. एस.व्ही.करमरकर सर, श्री पी.ए. नागपुरे सर ,श्री एन.एम. राजपूत सर संस्थेचे समन्वयक  श्री गोविंद गुजराथी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. या सर्व कॅडेट्स यांना  सेकंड ऑफिसर श्री रोहन पाटील सर व श्रीमती जयश्री बडगुजर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने