धानोरा येथे माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन 🔵 प्रचंड संख्येने उपस्थित राहा :– प्रा. ए के गंभीरसर यांचे आवाहन

 धानोरा येथे माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन 

🔵 प्रचंड संख्येने उपस्थित राहा :– प्रा. ए के गंभीरसर यांचे आवाहन 


   धानोरा, ता.चोपडा,दि.२१(प्रतिनिधी) – महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील माळी समाजाचे प्रमुख नेते आणि समाजसुधारक रविवारी धानोरा येथे ऐतिहासिक अधिवेशनासाठी एकत्र येत आहेत. क्षत्रिय माळी समाजसुधारक मंडळ, महाराष्ट्र आणि गुजरात माळी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २४ मे २०२६, सकाळी ९.३० वा., मिशन शाळा, सेंट्रल बँके समोर, धानोरा, ता. चोपडा, जि. जळगांव येथे होणार आहे.

           या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्यांच्या माळी समाज मंडळाचे  अध्यक्ष, श्री ए. के. गंभीर, समाजाच्या विकास, सामाजिक सुधारणा आणि भविष्यातील धोरणांवर प्रबळ चर्चेस उपस्थित राहणार आहेत.

              हे अधिवेशन केवळ सभेसाठी नाही, तर सर्व माळी समाजाच्या सदस्यांसाठी ऐतिहासिक संधी आहे. प्रत्येकाची उपस्थिती ही समाजाच्या उन्नतीसाठी एक पाऊल ठरेल.

         माळी समाजाचे सर्व सदस्य, नेते आणि युवक कार्यकर्ते, महिला भगिनी यांनी सभेत हजेरी लावून समाजाच्या विकासाच्या या ऐतिहासिक प्रवासाचा भाग होण्यासाठी सर्व सदस्यांनी उपस्थित राहून आपल्या समाजाच्या शक्तीची साक्ष दाखवावी, असे आवाहन  मंडळाचे अध्यक्ष  श्री. ए के गंभीर सर यांच्या कडून करण्यात आले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने