23मे रोजी चोपडा येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर
चोपडा,दि.२१(प्रतिनिधी)-श्री के डी चौधरी सर यांच्या अमृत महोत्सवनिमित्त श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, के डी चौधरी सर अमृत महोत्सव समिती चोपडा व गोदावरी फौंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.23मे 2026रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, तेली समाज मंगल कार्यालय श्रीराम नगर चोपडा येथे 23मे रोजी सकाळी 10ते दुपारी 2:00वाजेपर्यंत होणार आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालय जळगाव येथील तज्ज्ञ डॉक्टर शिबिरात सेवा देणार आहेत.
शिबिरात 2D-Echo, ECG कार्डीओग्राफ, रक्तदाब, तपासणी मोफत केली जाणार आहे. हृदयाला असलेले ASD/VSD छिद्र बिना ऑपेरेशनने बंद करणे, अंजीओप्लास्टिव बायपास शश्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.
याशिवाय मुतखडा, प्रोस्टेस्ट, पित्ताशय खडा, कर्करोग, बालरोग,नेत्र, हाडांचे फ्रॅक्चर, नाक कान घसा, हृदय रोग, जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, अस्थीरोग, मनसोपचार विभागातील तपासणी, व उपचार केले जाणार आहेत. शासकीय योजनेत न बसणाऱ्या शश्रक्रिया सवलतिच्या दरात केल्या जातील.
चोपडा तालुका व जळगाव जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष टी एम चौधरी सर, महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवकांत के चौधरी , श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाजाचे विश्वस्त नंदू गोविंदा चौधरी, कोषाध्यक्ष राजेंद्र गणपत चौधरी, समिती सदस्य किरण आनंदा चौधरी, सूर्यकांत के चौधरी, लखन तेली, रवी पाटील, रवींद्र चौधरी आदिनी केले आहे.
