टाळ-मृदुंगाच्या गजरात पुरुषोत्तम मास निमित्ताने श्रीमद् भागवत कथा सप्ताहास भक्तिमय प्रारंभ

 टाळ-मृदुंगाच्या गजरात पुरुषोत्तम मास निमित्ताने श्रीमद् भागवत कथा सप्ताहास भक्तिमय प्रारंभ





चोपडा,दि.२१(प्रतिनिधी) : अधिक मासानिमित्त कै. सौ. प्रतिभाताई नारायण बोरोले यांच्या पुण्य स्मरणार्थ श्रीमद् भागवत कथा व संकीर्तन सप्ताहाचे आयोजन बोरोले परिवार यांच्यातर्फे करण्यात आले आहे. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम दि. २१ मे ते २८ मे २०२६ दरम्यान पंकज विद्यालय, चोपडा येथे संपन्न होणार आहे.

दि. २१ मे रोजी सकाळी ग्रंथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते विश्वनाथ महादेव मंदिर ते पंकज विद्यालय दरम्यान टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्य ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बोरोले परिवार, पंकज नगर परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

तसेच या सप्ताहात ह.भ.प. तुळशीराम महाराज, नांदेड यांनी कथा वाचक म्हणून उपस्थित राहून श्रीमद् भागवत कथेद्वारे भाविकांना दुपारी 1ते 5 मधुर वाणीतून कथेस प्रारंभ केला.

या सप्ताहामध्ये दररोज काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम भागवत कथा, हरिनाम संकीर्तन, भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ सुरेश बोरोले, नारायण बोरोले, पंकज बोरोले,बोरोले परिवार व पंकज समूह, चोपडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने