महावितरण च्या विरोधात आदर्श नगरातील नागरीक एकवटले..वारंवार विजेचा लपंडाव, कमी व्होल्टेज मुळे नागरिक त्रस्त

 

महावितरण च्या विरोधात आदर्श नगरातील नागरीक एकवटले..वारंवार विजेचा लपंडाव, कमी व्होल्टेज मुळे नागरिक त्रस्त








चोपडा,दि.१६(प्रतिनिधी): सध्या सर्वत्र उन्हाने नागरीक त्रस्त झाले असून जळगाव जिल्ह्याचे तापमान 44अंश ते 45अंश सेल्सिअस पर्यंत जात असून नागरिक उकाड्याने हैराण झाले असून चोपडा शहरातील आदर्श नगरातील वीज वारंवार खंडीत होत आहे.आणि वीजपुरवठा हा कमी जास्त होत असल्याने अनेक घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाल्याच्या घटना ही घडल्या आहेत.आणि घरमालकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले आहेत.आणि अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारणी केली जात असल्याने नागरिकांचा संताप अनावर होतांना दिसत आहे.

 चोपडा शहरातील आदर्श नगरातील रहिवाशांनी महावितरणचे कार्यालय गाठून निवेदन दिले.उपअभियंता बोरसे आणि ज्युनियर इंजिनिअर केदारे यांच्यासोबत भ्रमणध्वनी वर संपर्क केला असता लवकरच नवीन डी.पी लावून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.निवेदन देतेवेळी लाईनमन खलसे आणि सचिन मोरे वायरमन हजर होते.

     त्यावेळी धनराज बडगे,दत्तात्रय सोनवणे, एस.पी.गुरव,सतीश सोनार,अनिल पाटील,अमोल पवार,धनंजय मोतीराळे,अमोल धनगर,गुलाब कोळी आणि पत्रकार मिलिंद सोनवणे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने