चोपडा तालुक्यात घर यादी व घर गणना करुन जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात ..60 पर्यवेक्षक व 362 प्रगनकांची नियुक्ती : तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची माहिती


चोपडा तालुक्यात घर यादी व घर गणना करुन जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात ..60 पर्यवेक्षक व 362 प्रगनकांची नियुक्ती : तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची माहिती 

चोपडा,दि.१६(प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व गावांमध्ये, आजपासून घर यादी व घरगणना करुन जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात आली आहे.सदर कामी 60 पर्यवेक्षक व 362 प्रगनक यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वांना तीन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.डिजिटल पद्धतीने मोबाईल फोनचा वापर करून घरांची माहिती संकलित करण्यात येणार आहेअशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे.

सर्व नियुक्त अधिकारी यांना दिनांक 15 रोजी साहित्याची किट वाटप करण्यात आले असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, तहसील कार्यालयात जनगणना कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे.जनगणना ही लोकशाहीची पायाभरणी असून तिचे महत्व भारताच्या संविधानात अधोरेखित करण्यात आले आहे त्यामुळे या प्रक्रियेत सर्व नागरिकांनी सहभागी होऊन पर्यवेक्षक व प्रकरणात यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे 

या टप्प्यामध्ये सर्व गावातील सर्व प्रभाग सर्व वस्ती, वाड्या, तांडे यामध्ये गृहभेटी करण्यात घरातील व्यक्ती, इमारत तसेच कौटुंबिक माहिती मोबाईल द्वारे सर्वरला पाठवली जाणार आहे.

दिनांक 1 ते 15 मे दरम्यान ज्यांनी स्वगणना केली आहे त्यांच्याकडून 11 अंकी आयडी क्रमांक घेऊन जनगणना पूर्ण केली जाणार आहे, ज्यांनी स्वगणना केली नाही किंवा ज्यांना करता आली नाही त्यांची संपूर्ण माहिती 1 ते 33 प्रश्न विचारून प्रगनकांकडून नोंदविली जाणार आहे.

ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून नागरिकांकडून कोणत्याही कागदपत्राची मागणी पडताळणीसाठी किंवा निरीक्षणासाठी करण्यात येणार नाही, त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता योग्य व बरोबर माहिती द्यावी असेही त्यांनी सांगितले..

घर यादी व घर गणगणना या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार सर्वसाधारणपणे 200 कुटुंबांना एक प्रगणक याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सहा प्रगनक यांच्या पर्यवेक्षणासाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे...

भारतामध्ये जनगणना 1872 पासून करण्यात येत असून ही दशकातील नियमित जनगणना आहे, स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना असून ती संपूर्णपणे डिजिटल आहडिजिटल जनगणनेमुळे सुलभता आणि पारदर्शकता वाढण्यास होणार आहे..जनगणनेच्या माहिती आधारे संपूर्ण देशाचे भविष्यकालीन नियोजन करण्यात येते, त्यामुळे सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे आणि जनगणना यशस्वी करावी असे श्री थोरात यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने