खेळ,आरोग्य आणि युवकांसह शहराच्या खऱ्या विकासासाठी कटिबद्ध राहिन !"नगराध्यक्षा सौ. नम्रताताई पाटील यांचे आश्वासन

 

खेळ,आरोग्य आणि युवकांसह  शहराच्या खऱ्या विकासासाठी कटिबद्ध राहिन !"नगराध्यक्षा सौ. नम्रताताई पाटील यांचे आश्वासन

​चोपडा दि.10(प्रतिनिधी) : शहरात आयोजित भव्य 'व्हॉलीबॉल स्पर्धेचे' उद्घाटन नगराध्यक्षा सौ नम्रताताई सचिन पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण  वातावरणात संपन्न झाले.
शारीरिक सुदृढता, सांघिक बांधिलकी आणि तरुणांमधील खिलाडूवृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने शहरातील खेळाडूंचा  उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

​याप्रसंगी श्री. सचिन रविंद्र पाटील, श्री. रविंद्र बळीराम पाटील तसेच शिक्षण सभापती श्री. अमोल पाटील यांची खास प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना आणि संघांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी   शुभेच्छा देऊन 'चोपडा शहर सुसंस्कृत-विकास पर्वा'च्या माध्यमातून शहरातील क्रीडा क्षेत्राला आणि  गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिन. मैदानावर असाच घाम गाळा आणि शहराचे नाव मोठे करा! असे आवाहनही नगराध्यक्षांनी  केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने