गो सन्मान आव्हान अभियाचा दुसरा टप्पा सुरू..२७जुलैला लाखोंच्या संख्येने उपस्थितीचे आवाहन
चोपडा दि.१५(प्रतिनिधी) :गो सम्मान आव्हान अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला दि. 14मे 2026 रोजी सुरवात झाली असून पाळधी येथील गो चिकित्सा हॉस्पिटल येथे आयोजित सभेत स्वामी गोपालानंद सरस्वती यांनी गोसेवकांच्या व साधू संतांसमोर सविस्तर माहिती दिली.
गोसन्मान आव्हान २७ एप्रिल २६ आंदोलन झाले त्यानंतर तहसीलदार चोपडा यांना ज़िल्ह्यातील सर्व तालुक्यातून ५१००० सह्यांचे निवेदन देण्यात आले तरीही केंद्रात काहीच हालचाल झाली नाही,म्हणून पुन्हा २७ जुलै २०२६ रोजी आता ज़िल्हाधिकारी जळगाव यांना गोसन्मानार्थ दुसरे निवेदन देणार लाखोंच्या उपस्थिती, लाखो सह्यांचे निवेदन देणार असून असे संपूर्ण भारत भर निवेदन दिले जाणार आहे.या बाबत प.पू.गुरुदेव भगवान यांनी वरील शपथ व आंदोलन रूपरेषा सर्व गोप्रेमीना देली.
त्यानुसार सर्व गोभक्तांनी आंदोलनास पाठिंबा देवुन स्वतः भाग घेवून दुसरे आंदोलन संपन्न करावे असे आवाहन या बैठकीत जळगाव,धुळे नंदुरबार गोपाल परिवार आणि साधू संतांनी उपस्थितांना केले.
