ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सुपर सिनियर सिटीझन संचालकांचा सत्कार
चोपडादि.१५(प्रतिनिधी): जेष्ठ नागरिक संघात आज दिनांक १५/५/२०२६ रोजी सकाळी १०: ०० वाजता प्रथम भारत मातेचे पूजन करून खरा तो एक ची धर्म ने सुरुवात करून ज्येष्ठ नागरिक संघाचे सुपर सिनियर सिटीझन संचालक यांचे ९२ वर्षात पर्दापण झाले त्यांचा वाढदिवस साजरा केला. तसेच संघास राज्य स्तरीय पुरस्कार मिळालेने तैलचित्राचे रमणलाल गुजराथी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी संघातील उपस्थित सभासद बंधू भगिनींना तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल बी. डी. ओ. अंजली बर्गे यांनी जेष्ठ नागरिकांचे महत्व सांगितले , पोलीस निरीक्षक पराग देसले,यांनी जेष्ठ नागरिक यांना सहकार्य देणेचे आश्वासन दिले तसेच संघास ११हजार देणगी दिली. सरकारी वकील नितीन माळी,यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा २००७ व २०१० बाबत सविस्तर माहिती दिली.तसेच आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी एन. सी. एम. सी.card मिळणे मार्गदर्शन केले. सभेचे अध्यक्ष .अॕड.व्ही. बी. पाटील हे होते.त्यांनीही ज्येष्ठ नागरिकांसाठी माहिती दिली , प्रास्ताविकेत संघाची स्थापना झालेली प्रगती राज्य स्तरीय उकृष्ट संघास पुरस्कार कसा मिळाले याबाबत सविस्तर माहिती दिली. यापुढे ही संघाची ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन विलास पाटील यांनी केले, मधुकर आबा यांनी व रमणलाल गुजराथी यांनी संघाचे कामकाजा बाबत कौतुक केले. पसायदान एन डी महाजन यांनी केले उपस्थितीचे आभार मानले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष जिजाबराव नेरपगारे,राजेंद्र साळुंखे, सतिश पाटील,गोविंदराव मराठे, रमेश शिंदे, एम डब्ल्यू पाटील, सुभाष पाटील,गोकुळ पाटील, परशुराम पेंढारकर, लोटन पाटील, विलास पाटील, आर व्ही चौधरी. देशमुख खैरनार., शांताराम लोहार , एल पी. पाटील प्रा. एस. एम. पाटील, एल. एम. पाटील. दिगंबर चौधरी, रतिलाल बडगुजर, भैय्या बडगुजर भगवान देशमुख, अरुण पाटील सी. आर. पाटील रामकृष्ण माळी, देवांग सर, संजय बडगुजर रमेश चौधरी , निर्मलाताई चौधरी, नलिनीदेशमुख, सुबोध गुजराथी, प्रकाश सपकाळे यांच्यास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
