चोपडा शहरात प्रथमच आज सायंकाळी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांची भव्य दिव्य शोभायात्रा

 चोपडा शहरात प्रथमच आज सायंकाळी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांची भव्य दिव्य शोभायात्रा



चोपडा,दि.१५(प्रतिनिधी) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  दि. १५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता चोपडा शहरातील मराठे गल्ली परिसरातून प्रथमच भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चोपडा शहराच्या इतिहासात यापूर्वी कधीही अशा स्वरूपाची शोभायात्रा निघालेली नसून यंदा प्रथमच हा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

या शोभायात्रेसाठी आयोजकांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करत प्रशासनाची अधिकृत परवानगी घेतलेली असून पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार आहे.

शोभायात्रेमध्ये आकर्षक देखावे, ढोल-ताशा पथके, लेझीम, भगवे ध्वज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणे करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा काढण्यात येणार असून ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

धर्मरक्षणासाठी आणि स्वराज्यासाठी अतुलनीय बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार युवकांपर्यंत पोहोचावेत तसेच त्यांच्या शौर्याचा आदर्श समाजासमोर निर्माण व्हावा, या उद्देशाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक गजेंद्र जैसवाल, राकेश मराठे, सुशील खैरनार, गोपाल पाटील, गणेश मराठे, कमलेश मराठे, यांनी दिली 

तरी चोपडा शहरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आई भवानी युवा मित्र मंडळ मराठे गल्ली यांच्याकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने