घोडगावची लेक हेमागी जैन दिव्यांगातून धुळे जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

 घोडगावची लेक हेमागी जैन दिव्यांगातून धुळे जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण 


चोपडा दि.५(प्रतिनिधी)तालुक्यातील घोडगाव येथील संदीप जैन (पप्पू शेठ चामुंडा मेडिकल) यांची मुलगी हेमागी जैन हिने 12 वी परिक्षेत कला शाखेत 88.00% टक्के मार्क मिळवून दिव्यांगांमध्ये जिल्ह्यातून प्रथम आली आहे. 

शिरपूर आर सी पटेल माध्यमिक विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माजीआमदार अमरीश पटेल, कार्याध्यक्ष भूपेश पटेल, नगराध्यक्ष चिंतन पटेल, प्र उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव रेषा पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, नि अकॅडमीक इन्चार्ज पी. व्ही. पाटील  यांनी तिचे कौतुक केले आहे.   तसेच घोडगाव परिसरातून प्रा. विजयकांत पाटील,विजय रजाळे,किशोर पाटील,संदीप पाटील,दीपक बुवा,बंटी पाटील, कुणाल पाटील, पपू पाटील, यांच्यासह अनेकांनी कौतुक करून अभिनंदन  केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने