जिद्द, मेहनतीच्या जोरावर स्वप्न सत्यात उतरवत घाडवेलचे महेंद्र पाटील झाले "पीएसआय "

 जिद्द, मेहनतीच्या जोरावर स्वप्न सत्यात उतरवत घाडवेलचे महेंद्र पाटील  झाले "पीएसआय " 

चोपडा दि.५(प्रतिनिधी):  जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर घाडवेल येथील सुपुत्र  महेंद्र मीनाबाई प्रकाश पाटील यांनी MPSC परीक्षेतून PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदावर दिमाखदार निवड मिळवली असून, संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

साध्या कुटुंबातून आलेल्या महेंद्र पाटील यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे अपार कष्ट आणि त्याग दडलेला आहे. रोजंदारी व मोलमजुरी करून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. अत्यंत कठीण परिस्थितीत वाढूनही महेंद्र यांनी शिक्षणाला प्राधान्य देत स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर यशाचा मार्ग तयार केला.

महेंद्र पाटील यांनी B.Sc. शिक्षण घेत असतानाच मोठं स्वप्न पाहिलं—फक्त पोलिस नव्हे, तर PSI व्हायचं! २०१४ साली पोलिस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाल्यानंतरही त्यांनी समाधान मानले नाही. नोकरी, कुटुंब आणि जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी सलग चार वर्षे अभ्यास करून अखेर हे मोठं स्वप्न साकार केलं.

विशेष म्हणजे, घाडवेल गावात आधीच सुमारे ५० च्या आसपास तरुण पोलीस व सैन्य दलात कार्यरत आहेत. या परंपरेला पुढे नेत महेंद्र पाटील यांनी PSI पद मिळवून गावाचा नावलौकिक उंचावला आहे.

त्यांचा हा प्रवास केवळ यशोगाथा नसून “Low aim is crime” या विचाराचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या या यशामुळे गावातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळणार असून मोठं स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची ताकद निर्माण होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

या यशाबद्दल अशोक छन्नु कोळी यांनीही आनंद व्यक्त करत संपूर्ण घाडवेल गावात आनंदाचा वर्षाव झाल्याचे सांगितले. तसेच पो. पाटील भागवत पाटील, रमेश पाटील (B.E.S.T. मुंबई चालक), संदिप धनगर (S.T. चालक) आणि राहूल कोळी यांनीही महेंद्र पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचा गौरव केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने