NMMS परिक्षेत प्रताप विद्या मंदिराचे २०विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र..४८ उत्तीर्ण
चोपडा दि.२५(प्रतिनिधी) : येथील प्रताप विद्या मंदिराने यशाची परंपरा कायम ठेवत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात आपले नाव उंचावले आहे .या परीक्षेत एकूण 47 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात २० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी ₹12,000 प्रमाणे पुढील ४ वर्षांसाठी एकूण ₹48,000 शिष्यवृत्ती मिळणार आहे.
यात कु अदिती कासार (Gen 13 ) तेजल महाजन ( obc 3) शिवराज रविंद्र मोरे ( Sc 4) हर्षल संजय कोळी ( ST 16) मयूर समाधान धनगर ( NT 4 ) रोहित रविंद्र कोळी ( SBC 2 ) असे संवर्ग निहाय गुणानुक्रम नुसार शाळेत प्रथम आलेले विद्यार्थी आहेत .ही यशस्वी कामगिरी विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेची समृद्ध परंपरा यांचे फलित आहे. पी व्ही जोशी व एल बी पाटील, ए पी पाटील , डि आर माळी, सौ के जे पाटील यांनी मार्गदर्शन केले .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सौ शैलाबेन मयूर ,उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर ,संचालक चंद्रहासभाई गुजराथी , भूपेंद्रभाई गुजराथी, रमेश जैन आदी संचालकांनी व मुख्याध्यापक श्रीमती माधूरी पाटील ,उपमुख्याध्यापक अतुल भट,उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षक पंकज नागपुरे, सचिन करमरकर, एन एम राजपूत ,समन्वयक गोविंद गुजराथी व सर्व शिक्षकवृंदाने अभिनंदन केले .
