वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन

 वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन


चोपडादि.२५(प्रतिनिधी) तालुक्यातील वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवताप दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) दरवर्षी २५ एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. समाजामध्ये हिवताप म्हणजेच *मलेरिया* या जीवघेण्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि या आजाराचे पूर्णपणे निर्मूलन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 

   या अनुषंगाने आज वैजापूर आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यात आला.वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहन मराठे यांनी हिवताप संबंधी माहिती तसेच मार्गदर्शन केले.तसेच परिसर स्वच्छता आणि उपचार पद्धती देखील विषद केल्यात.याप्रसंगी सर्व आरोग्य कर्मचारी,अधिकारी वृंद उपस्थित होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने