चोपडा महाविद्यालयात आयबीपीएसपीओ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
चोपडा दि.१६(प्रतिनिधी) : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा, पदव्युत्तर वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र तर्फे आयबीपीएसपीओ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आयबीपीएस पीओ परीक्षा उत्तीर्ण महाविद्यालयातील बीकॉम चा माजी विद्यार्थी पवन जगन्नाथ मराठे याने The Institute of Banking Personnel Selection Probationary Officer (PO) परीक्षा उत्तीर्ण करून बँक ऑफ बरोडा मध्ये क्लास वन ऑफिसर ची नोकरी मिळविली त्यामुळे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ॲड .संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. सौ .स्मिता संदीप पाटील यांनी पवन जगन्नाथ मराठे याचे कौतुक करत सत्कार केला. तसेच बीकॉमचा दुसरा माजी विद्यार्थी दिगंबर महाजन यांनी देखील पोलीस दलामध्ये नियुक्ती मिळवली त्याबद्दल त्यांचेही स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. संध्या एम सोनवणे , महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. डी . ए.सूर्यवंशी,उपप्राचार्य डॉ. के .एन .सोनवणे, उप प्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी,समन्वयक डॉ. एस .ए. वाघ, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी. आर. देवरे, सहा प्रा. पी . आय.जैन, तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते व प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे आलेला हा विद्यार्थी व त्याने आपल्या गरिबीवर मात करत तसेच संपूर्ण कुटुंबाची धुरा सांभाळत अतिशय चांगली अशी परीक्षा उत्तीर्ण केली व क्लास वन ऑफिसर ची नोकरी मिळवली ही संस्थेसाठी, महाविद्यालयासाठी व विभागासाठी अभीमानाची गोष्ट आहे. असेच विद्यार्थ्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी अशा शुभेच्छा त्यांनी या प्रसंगी दिल्या.
