हातेड खुर्द येथील एकनाथ पाटील बेपत्ता धुळे पोलीस ठाण्यात खबर

 हातेड खुर्द येथील एकनाथ पाटील बेपत्ता  धुळे पोलीस ठाण्यात खबर


गणपूर,ता चोपडा दि. 24: (प्रतिनिधी)हातेड खुर्द (ता चोपडा) येथील एकनाथ मोहन पाटील हे 59 वर्षीय प्रौढ विंचूर (ता धुळे) येथून 4 मार्च 2026 रोजी बेपत्ता झाल्याची खबर त्यांच्या पत्नी सुरेखा पाटील यांनी धुळे पोलीस ठाण्यात दिलीअसून या खबरीची नोंद 35/2026 नुसार करण्यात आली आहे.

 पाच फूट चार इंच उंची, रंग सावळा, केसांची ठेवण साधारण, मराठी आणि अहिराणी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे एकनाथ पाटील  विंचूर (ता धुळे )येथून 4 मार्च ला बेपत्ता झाले असून तशी नोंद धुळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ते कुठे आढळून आल्यास पोलीस ठाण्यात किंवा त्यांच्या गावी कळविण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबाने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने