स्केटिंग खेळाडू तेजस्वीनी सोनवणे हिचा भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
जळगाव दि.२६(प्रतिनिधी) : ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थे कडून भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार 2026 हा स्केटिंग खेळाडू तेजस्विनी विनोद सोनवणे हिस जाहीर झाला.
हा पुरस्कार संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड व कार्याध्यक्ष प्रा.महादेव महानोर यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. याआधीही दिल्ली येथे india proude book OF record या संस्थे कडून स्वर्ण भारत पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे.
सन२०१७ ते २०२१या कालावधीत विविध स्पर्धांमध्ये तिने प्राविण्य प्राप्त केले आहे.सन२०२२मध्ये पोलीस कवायत मैदानावर रिंकवर सलग एका तासात 42 किलोमीटर स्केटिंग करत बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरल्याचा विक्रम केला आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ती विविध स्पर्धांवर मात करीत आगेकूच करीत आहे. तिच्या यशाबद्दल विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.
