उमेश पाटील याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
चोपडा दि.28(प्रतिनिधी):-गणपुर येथील उमेश(ओम) रवींद्र पाटील या चौदा वर्षीय शाळकरी मुलाने अनेर नदीत बुडणाऱ्या चार मुलांचे प्राण वाचवल्या बद्दल त्याचा मान्यवरांकडून सत्कार होत असून त्याच्या शौर्याचे कौतुक होत आहे.विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी त्याचा त्याच्या घरी येऊन सत्कार करून बक्षीस देत त्याच्या धाडसाचे कौतुक केले.
यावेळी शशिकांत पाटील,पत्रकार ऍड बाळकृष्ण पाटील उपस्थित होते. जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे यांनीही त्याच्या कार्याची दखल घेत त्याचा गणपूर येथे सत्कार केला. त्यावेळी धानोऱ्याचे रवि चौधरी,घोडगाव चे उपसरपंच किशोर दुसाने, दीपक वानखेडे, हर्षल करंदीकर, विनोद पाटील डॉ किरण पाटील ,प्रवीण पाटील, गणेश पाटील व ओम चे वडील रवींद्र साहेबराव पाटील उपस्थित होते.
