चोपडा शहरात"रन फॉर अजित दादा" सदभावना रॅली संपन्न..

 चोपडा शहरात"रन फॉर अजित दादा" सदभावना रॅली संपन्न..




चोपडा दि.२८(प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी घटनेस आज दोन महिने झाले.त्याअनुषंगाने  स्मृति अभिवादनानिमीत्त  चोपड्या शहरात"रन फॉर अजित दादा"  ह्या सदभावना रैली चे आयोजन  सुनिल पाटील (वाळकी, चोपडा) ह्यांच्या संकल्पनेतुन करण्यात आले.

याप्रसंगी माजी विधान सभाध्यक्ष अरुण भाई गुजराती, माजी आमदार कैलास पाटील,माजी आमदार दिलीपराव सोनवणे,माजी चो.सा.का.चेअरमन घनःश्याम पाटील , चोपडा पिपल्स बँक चेअरमन चंद्रहास गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,गोपाळराव सोनवणे जिल्हाध्यक्ष सा.न्याय विभाग लहुश धनगर प्रताप नगरसेवक प्रवीण देशमुख, नगरसेवक, नरेंद्र पाटील, नगरसेवक,दिपक पाटील, नगरसेवक अमोल पाटील,रानु  देशमुख, ईम्रान बागवान,तालुकाध्यक्ष विजय पाटील,शशीकांत पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कामगार आघाडी प्रदीप पाटील, युवती जिल्हाध्यक्ष मोनाली पवार,संजय कानडे,नोमान काझी,शाम परदेशी, प्रफुल्ल स्वामी,जमील कुरेशी,राकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.विविध शाळेतील मुले व विविध घटकातील सुजाण नागरिकांनी सहभाग घेतला.कस्तुरबा ,बालमोहन ,महीला मंडळ ,विवेकानंद ,एंग्लो उर्दू , प्रताप विद्यामंदिराचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने