चोपड्यात महिला पोलिस पाटलांचा सन्मान
चोपडा,दि.९(प्रतिनिधी): जागतिक महिला दिनानिमित्त चोपडा येथे महिला पोलिस पाटील यांना केले सन्मानित करण्यात आले.
हा दिवस केवळ शुभेच्छांचा नसून, महिलांवरील अत्याचार कमी करणे आणि त्यांना समान संधी देणे याबद्दल जागृती करण्याचा आहे . डिजिटल युगात महिलांनी घर आणि करिअरचा समतोल साधत, "सुपरमॉम" ची नवी ओळख निर्माण केली आहे. सर्व पोलिस पाटील यांच्या वतीन पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष नंदलाल बाविस्कर वडगाव सिम यांनी सत्कार केला
यावेळी सत्कारार्थी महिला पोलीस पाटील मा. उपाध्यक्ष, वंदना मोरे संपले, सुनिता पाटील धुपे बु. चारुलता देवराज गलंगी ,पुष्पा कचरे मजरे हिंगोणे, अर्चना पाटील तावसे बु., मनीषा पारधी मराठे, रत्नाबाई पाटील गणपूर, अर्चना पाटील खचणे हे उपस्थित होते तसेच जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील हातेड बु.मा.अध्यक्ष दत्तात्रय पाटील खडगाव, ज्येष्ठ पोलिस पाटील हिरामण पाटील घुमावल, अध्यक्ष नंदलाल बाविस्कर वडगाव सिम, कार्याध्यक्ष नितीन पाटील दोंदवाडे ,सचिव भागवत पाटील घाडवेल, सदस्य संजय कोळी विष्णापूर,सचिन पाटील गलवाडे,जितेंद्र पाटील लासूर, आनंद शिरसाठ विचखेडा, रत्नाकर पाटील कठोरा, दीपक पाटील कुरवेल, अमर पावरा मालापूर ,पवन भील निमगव्हाण, प्रल्हादसिंग भुगवाडे उमर्टी, कालरसिंग बारेला खऱ्यापाडाव , योगेश सोनवणे सत्रांसेन, व चोपडा ग्रामीण चे पोलिस पाटील उपस्थित होते.
