आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत-डॉ.संजय पाटील

 आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत-डॉ.संजय पाटील

चोपडा,दि.९(प्रतिनिधी):  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  कार्यशाळेच्या  समारोप सोहळा  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

    या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थी विकास संचालक डॉ. चंद्रशेखर वाणी व धुळे जिल्हा समन्वयक विवेकानंद चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

      या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यशाळा निरीक्षक डॉ. स्वप्निल खरे, डॉ. अजय पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, प्र. रजिस्ट्रार डी. एम. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार आदि मान्यवर उपस्थित होते.   

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी तीन दिवसातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.   

   यावेळी विविध जिल्ह्यातील विद्यार्थी हिमांशु बागुल, प्रमोदकुमार चौरसिया, कक्षा देसले, गायत्री जाधव, निलेश भोई, प्रग्नेश झांबरे यांनी आपल्या मनोगतातून कार्यशाळेच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनाबद्दल  कौतुक केले.

    याप्रसंगी कार्यशाळा निरीक्षक स्वप्नील खरे यांनी महाविद्यालयाचे कौतुक करतांना सांगितले की, कार्यशाळेत आयोजित केलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यात कला क्षेत्रात निश्चितच प्रगती करतील असे मत व्यक्त केले. 

   याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सदर कार्यशाळा महत्वाची असल्याचे स्पष्ट केले. तसेच जीवनातील प्रत्येक ठिकाणी कला गुण कौशल्य आत्मसात केल्यास यशस्वी होणे तसेच जीवन जगणे सोपे होईल. यावेळी त्यांनी महाविद्यालयाने कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. 

    अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी विविध उदाहरणातून जीवनातील नृत्य नाट्य, संगीत यांचे महत्व समजावून सांगितले व शेवटी विद्यार्थ्यांना भविष्यात या कार्यशाळेतील प्रात्यक्षिकांचा फायदा होईल यात शंका नाही असे मत व्यक्त केले.

   या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. पी. एम. रावतोळे यांनी केले तर आभार डॉ. सौ. के. एस. क्षीरसागर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन व संयोजन समिती प्रमुख, सदस्य व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने