नाशिक पालीवाल समाजातर्फे डॉ.पालीवाल यांचा सत्कार
नाशिक,दि.९(प्रतिनिधी).. महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे महामंत्री व ज्येष्ठ पत्रकार श्री अनिलकुमार द्वा. पालीवाल यांना पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ तर्फे नुकत्याच प्राप्त झालेल्या पीएचडी,मानद डॉक्टरेट सरस्वती सन्मान बद्दल येथील पालीवाल समाज व पालीवाल महिला मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
पालीवाल समाज अध्यक्ष कांतिलाल पालीवाल,महिला मंडळ अध्यक्ष सौ.मनिषा पालीवाल यांनी डॉ.अनिलकुमार पालीवाल यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच रंगोत्सव निमित्ताने रंग लावून सत्कार केला. याप्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष सुधीर पालीवाल,सचिव तुषार पालीवाल,सहसचिव दीपक पालीवाल,कोषाध्यक्ष गणेश पालीवाल,शांतीलाल पालीवाल,अरुण पालीवाल,मधुकर पालीवाल,आशिष पालीवाल,अतुल पालीवाल,सौ.मनिषा पालीवाल,सौ.आक्काताई पालीवाल,सौ.नमिता पालीवाल,सौ.ज्योती पालीवाल,सौ.रश्मी पालीवाल,सौ.किरण पालीवाल, गायत्री पालीवाल,सौ.भारती पालीवाल,प्रियांका पालीवाल, आदि सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
