मंगरूळ येथे आज चर्मकार महासंघाचे शाखेचे उद्‌घाटन

 मंगरूळ येथे आज  चर्मकार महासंघाचे  शाखेचे उद्‌घाटन  


अडावद ता.चोपडा,दि. ११ (प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या मंगरूळ  येथे उद्या दि १२ वार गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शाखेचे उद्‌घाटन धरणगांव येथील राष्ट्रीय कार्याध्यक्ष  भानुदास विसावे    व   मंगरूळ येथील सरपंच व चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे  .

   या  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून     जिल्हा उपाध्यक्ष अरुण मोरे,   चोपडा तालुका अध्यक्ष सोपान मोरे,     जितेंद्र विसावे,  निलेश वाघ , मंगल चव्हाण,  प्रभू अहिरे, विकी अहिरे,  सचीन विसावे   हे उपस्थित राहणार आहेत.

   तरी चोपडा तालुक्यातील व मंगरूळ गावातील   व परिसरातील  सर्व चर्मकार समाज बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघ व समस्त चर्मकार समाज बांधव मंगरूळ  आयोजक यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने