समाजकार्य महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर कार्यशाळा संपन्न
चोपडा दि.११(प्रतिनिधी): येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उपयोग या विषयावरील कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेसाठी दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. कुणाल गायकवाड यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विचार पिठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य प्रा.डॉ.आशिष गुजराथी, कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ. राहुल निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.डॉ. राहुल निकम यांनी सदर कार्यशाळेची आवश्यकता आणि उद्देश स्पष्ट केला.
यावेळी प्रा.डॉ. कुणाल गायकवाड यांनी समाजकार्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयोगिता समजावून सांगितली. संशोधन, अहवाल लेखन, समुदाय संघटन आणि विकास या समाजकार्यातील महत्वपूर्ण पद्धतीत कृत्रिम बुद्धिमत्तेने कशाप्रकारे उत्तम कार्य करता येऊ शकते हे पीपीटी द्वारा समजावून सांगितले. आजचा काळ हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काळ असल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी या वेळेला नमूद केले.
प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर व उपप्राचार्य प्रा.डॉ.आशिष गुजराथी यांनी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरावी असे आवाहन केले. आभार प्रदर्शन प्रा.डॉ. मारोती गायकवाड यांनी केले. या कार्यशाळे करिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
