अभय योजनेमुळे निवासी मालमत्तां करावरील व्याज व दंड १००% सूट ..२५ मार्चपर्यंत चोपडा नगरपरिषदेत मिळणार लाभ

 ‘अभय योजनेमुळे निवासी मालमत्तां करावरील व्याज व दंड १००% सूट ..२५ मार्चपर्यंत चोपडा नगरपरिषदेत मिळणार लाभ


चोपडा दि.११(प्रतिनिधी)नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे. ही योजना दिनांक २५ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार असून या कालावधीत नागरिकांनी थकीत पाणीपट्टी व मालमत्ता कर  एकरकमी भरल्यास त्या थकबाकीवर आजपर्यंत आकारण्यात आलेल्या व्याज व दंडावर १०० टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेमार्फत देण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या नोंदीनुसार अनेक निवासी मालमत्ताधारकांकडे मागील काही वर्षांपासून कर व पाणीपट्टी थकबाकी प्रलंबित आहे. नागरिकांना आर्थिक सवलत देऊन थकबाकी नियमित करण्यासाठी तसेच नगरपरिषदेच्या विकासकामांना गती देण्यासाठी ही विशेष अभय योजना राबविण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

................... चौकट नं.१..........

*“नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी कर व पाणीपट्टीची वेळेत वसुली होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना थकबाकी नियमित करण्याची संधी  देणारी अभय योजना राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली थकबाकी एकरकमी भरावी.या. योजनेचा लाभ न घेतल्यास नियमानुसार पुढील काळात थकबाकीदारांवर वसुलीची कडक कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तत्काळ नगरपरिषद कार्यालयात किंवा संबंधित विभागात कर भरावा.

               श्री.रामनिवास झंवर(मुख्याधिकारी न.प.चोपडा)

.................... चौकट.नं२.......

“चोपडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि थकबाकी कमी करण्यासाठी ही अभय योजना राबविण्यात येत आहे. व्याज व दंडावर १००% सूट ही मोठी संधी असून शहरातील सर्व निवासी मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.आपला कर वेळेत भरून शहराच्या विकासात आपला सहभाग नोंदवा. २५ मार्च २०२६ पूर्वी एकरकमी कर भरून व्याज व दंडमाफीचा लाभ घ्या आणि चोपडा शहर अधिक स्वच्छ, सुबक व विकसित करण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करा.” 

            सौ. नम्रता सचिन पाटील (नगराध्यक्ष,न.प. चोपडा)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने