चोपडा येथे बालक व पालक मेळावा उत्साहात

 चोपडा येथे बालक व पालक मेळावा  उत्साहात     

चोपडा दि.२९(प्रतिनिधी) :  आधार बहुउद्देशीय संस्थातर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या चोपडा व अमळनेर येथील बालक व त्यांच्या पालकांचा तसेच चाइल्ड सर्वांवर नेटवर्क (बालक बचाव संरक्षण नेटवर्क) मेळाव्याचे आयोजन जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन्स प्रकल्पांतर्गत श्री संत सावता माळी समाज सभागृह चोपडा येथे करण्यात आले. शासना च्या  महिला बालविकास विभागातर्फे अनाथ एकल किंवा अपंग पालकांच्या बालकांसाठी बालसंगोपन योजना राबविली जाते विशेषता कोरोना नंतर जी मुले अनाथ झाली. त्यांचा यात समावेश करण्यात आला. पालक बालकांमध्ये संवाद व्हावा त्यांना सविस्तर माहिती मिळावी म्हणून पालक बालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.यात 250 पालक व बालकांनी आपला सहभाग नोंदविला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष  तहसीलदार भाऊसाहेब थोरात  त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  शासकिय योजना व शासकीय कर्मचारी याची भूमिका, जी बालके काळजी व संरक्षणा खाली येतात या बालकांना शासनातर्फे उपलब्ध असलेल्या सर्व सेवा सुविधा यांची माहिती दिली. 

 .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा येथील पोलीस उप निरीक्षक युवराज वाळूंज यांनी आपल्या  भाषणात मुलांशी संबंधित असलेले बाल लैंगिक संबंधी कायदे व बालविवाह बदल मुक्त भारत , बाल लैंगिक शोषण याविषयी समजावून सांगितले. प्रमुख वक्ते म्हणून आधार संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील यांनी महिला सक्षमीकरण व हक्क विषयी मार्गदर्शन केले. 

 प्रास्ताविक आधार संस्थेचे कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद  यांनी केले .एक्सेस टू जस्टिस प्रकल्पाच्या समन्वयक मोहिनी धनगर  व प्रा. विजय वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.  सूत्रसंचालन बालसंगोपन योजनेचे समन्वयक दिपक विश्वेश्वर यांनी केले. यशस्वीतेसाठी  मुरलीधर बिरारी आनंद पगारे , मोहिनी अहिरे, दीप्ती शिरसाठ, ऊर्जिता शिसोदे, भावना सुर्ववंशी वंदना पावरा यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने