शिक्षण शास्त्र महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात

 शिक्षण शास्त्र महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात 

चोपडा दि.१९(प्रतिनिधी): येथील शिक्षण शास्त्र महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. रजनी सोनवणे या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सविता जाधव यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. रजनी सोनवणे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना अफजलखान पराभवाचे उदाहरण देऊन त्यांच्या धैर्य, दूरदृष्टी व कुशल रणनितीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचे अनुकरण करून विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा व राष्ट्रनिष्ठा जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माधुरी चौधरी, शोएब शेख, ज्ञानेश्वर कोळी, मयुरी पाटील, योगिनी चौधरी व अश्विनी पवार या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. सुवर्णा बिऱ्हाडे व शितल महाजन यांनी ‘शिवगर्जना’ सादर करून उपस्थितांना प्रेरित केले.

कार्यक्रमास माजी प्राचार्य श्री. एम. पी. पाटील, प्राचार्या डॉ. रजनी सोनवणे, प्रा. डॉ. सविता जाधव तसेच बी.एड.चे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने